Monday, 7 July 2014

तीती त्या दिवशी एकटीच बसली होती bus stop वर. मी तिच्याकडेच पाहत होतो, पण काहीच कळत नव्हतं. एक पुस्तक घेऊन अशा एकाकी stop वर बसण्याचं कारण सापडत नव्हत. बराच वेळ झाला मी इथेच आहे, पण ती नक्कीच पुस्तक वाचत नाहीये, ते फक्त बाहेर दाखवायला आहे. आत एक द्वंद्व चाललंय तिच्या, चेहेऱ्यावरचे भाव वेगळच काहीतरी सांगत होते. आणि प्रश्न मला पडत होते ‘कोण आहे हि? काय करतीये हि इथे? बोलाव का मी हिच्याशी?’ मनातल्या मनात अनेक संवाद तयार झाले होते माझ्या. म्हणजे मी काय सुरुवात करेन आणि मग ती काय reply देईल ह्याचे combinations करून बघत होतो मी. पण खरतर त्यातलं काहीच घडलं नाही. कारण मला सुरुवात कशी करू हेच कळत नव्हत मला. एका अनोळखी मुलीशी बोललो तर ती काय विचार करेल? ह्यापेक्षा आजूबाजूचे काय विचार करतील हि भीतीच जास्त असते मनात.

एवढ्यात जरा बाजूला लक्ष गेलं. एक पोरांचं टोळक त्या मुलीला पाहून comments pass करत होते. पण तिच्यावर ह्याचा काहीच परिणाम होत नव्हता. असं वाटत होता कि हिला काही घेणंदेणच नाहीये आजूबाजुच्यांशी. ती फक्त उत्तर शोधायला आलीये, तिला पडलेल्या प्रश्नांची. आज ती फक्त तिच्यासाठी होती, बाकी तिला काहीच माहिती नव्हतं.पण अशी हि उत्तरं बाहेर मिळतात? त्यासाठी कोणीतरी आपलं माणूस लागतं. त्याला सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं माहिति नसतात, पण ती व्यक्ती असल्यावर असले प्रश्नच पडत नाहीत. आणि मला तर सारखा वाटत होता कि हिला कोणीतरी हवय बोलायला, मनातल सगळं सांगायला. पण ती घाबरतेय आणि मी पण घाबरतोय, पण कोणाला?

अरे एक मिनिट, हा एवढा गोंगाट का वाढलाय? एवढे लोक कुठून आले? आणि ते टोळक कुठे गेलं मागचं? आणि ती कुठे गेली? अग थांब कि, कुठे चाललीयेस? मला बोलायचंय तुझ्याशी. अरे!! हा bus stop पण निघून गेलाय. मी कुठे पुढे पुढे चाललोय? चला आज पुन्हा पुढच्या stop वर उताराव लागणार वाटत. पण अरे!! हि कोण उतरतीये माझ्याबरोबर!!!


No comments:

Post a Comment