शनिवार, ६ डिसेंबर, २०१४

आठवण...





कधी कधी ना काहीच लिहावास वाटत नाही. काहीच बोलावसं वाटत नाही. फक्त तुझ्या आठवणीत रामावासा वाटतं. शांत बसून राहावसं वाटतं. आपोआप आजूबाजूचं भान जातं. शांत बसून राहतो मी. मग माझ्या बाजूला चाललेय डी जे चा पण त्रास होत नाही. कारण तू माझ्याबरोबर असतेस.

मग अशावेळी कोणाचीच गरज वाटत नाही. फक्त तू आणि मी. मी आपल्यातल मस्त बोलणं तयार करतो. त्याच्या background ला कायम एक romantic music चालू असतं.कधी तरी मध्येच पावसाची एखादी सर येते. आपण दोघं कुठेतरी लांब गेलेलो असतो. तिहेच मग नेमका भज्यांच पण stall सापडतो. मग वातावरणातला शिनावता अचानक गायब होतो. प्रसन्ना वाटायला लागतं. खरतर त्यावेळी काय वाटतं ह्याला शब्दच नाहीयेत. ती फक्त एक भावना असते. तो फक्त एकच क्षण...तो फक्त अनुभवत येतो.

थोड्या वेळाने बाहेरचा पाऊस बंद पडतो. आपण दोघं तिथून कुठेतरी निघायला म्हणून उठतो आणि तेवढ्यात आईची हाक ऐकू येते. मला वाटतं कि आईने पाहिलं आपल्याला. पण नाही... तेवढ्यात तू कुठेतरी गायब होतेस आणि आई अचनक म्हणते “काय रे सकाळी सकाळी हि smile!!”  मग मी म्हणतो “आई तू पण ना..काहीही बोलतेस..”

पण मनात मात्र दुसरच काहीतरी चालू असतं. विरहाच पण एक वेगळाच आनंद असतो यार.फक्त आठवणीने कधीतरी मस्त वाटतं.  

1 टिप्पणी: