Friday, 3 April 2015

उत्तर

उत्तर


तुझी ना कधी कधी खूप आठवण येते. तू अशी का जातेस ग लांब माझ्यापासून? मला ना खूप गोष्टी बोलायच्या असतात तुझ्याशी.. पण कधी कधी काय बोलू हे कळतच नाही. काय बोलायचं रोज रोज?
खरंतर ना रोज मला तुला एकाच गोष्ट सांगायची असते. पण साला ती गोष्ट अशी बोलता येत नाही. अश्या ना भावना मनात असतात, पण त्यांना तुझ्यासमोर कधीच शब्द सुचत नाहीत. मग पुन्हा तेच होतं. मी पुन्हा दुसर्या दिवशी ठरवतो, नवीन शब्द तयार करतो आणि ते शब्द पुन्हा ऐनवेळी दगा देतात.
आता ना मला तुझ्याशी बोलायची भीती वाटायला लागलीये. माहिती नाही का? पण एक अनामिक भीती बसलीये स्वतःबद्दल. तुझा message आला ना कधीतरी किंवा फोन आला तरी ही भीती माझा पाठलाग करत असते. कधी माझ मन मला दगा देईल आणि ती गोष्ट मी कधी बोलून जाईल मलाच कळेनास झालय. आता असह्य व्हायला लागलाय तुझ्याबरोबर राहणं, बोलणं, भेटणं. कायम ‘ती’च एक गोष्ट मनात.
खरच आपली मैत्री झाली तेव्हा बरा होतो मी. आता काय झालाय मला? का असे सारखे तुझ्याबद्दल विचार येतात? आणि ह्याने आपली मैत्री एक अगदी नवीनच वळण घेईल, हे का कळत नाहीये मला? कोणत ते माहिती नाही.पण त्यानंतर गोष्टी बदलातील नक्कीच. कदाचित तू मला हो म्हणशील कदाचित नाही. पण तू काहीच म्हणाली नाहीस तर? कळत नाहीये काय करू? कोणाला विचारू हे सगळ?
 काहीतरी मी तुझ्या बाजूचा पण विचार करायला लागतो. मग वाटत तुला पण असाच वाटत असेल का माझ्याविषयी? कधीच तुला काहीच वाटलं नसेल का इतके दिवसात? तुला पण कधीतरी सगळ सांगून टाकाव असा वाटलं नसेल? मला ना ह्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीयेत. मला सारखा वाटतय कि फक्त तुझ्याकडे उत्तरं आहेत. पण हे प्रश्न नेमके तुला विचारता पण येत नाहीत. अस्वस्थ मी. आणि तू? माहिती नाही.
तू हि अशी लांब माझ्यापासून. Communication चे सगळे mediums एवढे जवळ. हे physical distance खरंतर नाही separate करत आपल्याला. काय separate करताय मग? का मी रोज तुझ्या फोन ची वाट बघतोय? का तुझ्या त्या एका message ची वाट बघतोय मी? काय झालाय मला? काय बदललंय आपल्यात? बारा झाला तू आत्ता एवढी लांब आहेस माझ्यापासून. गोंधळ चाललाय डोक्यात नुसता. कान बंद केले तरी ऐकू येणारा.
पण एवढ्यात फोन वाजतोय. कोण आहे रे? मी वैतागून फोन हातात घेतो. बघतो तर तूच. Confusion वाढत चाललंय. उचलू? नको उचलू? काय करू? पण मी नाही करू शकत अस तुझ्याबरोबर. मी फोन उचलतो आणि फक्त hello म्हणतो. तिकडून तुझी नुसती बडबड चालू होते. मी आजपण तुझ्याशी काहीच बोलत नाही. पण आता गोंधळ शांत झालाय. फोन ठेवल्यावर पण अस्वस्थ वाटत नाहीये.उत्तरं सापडलाय.
मला काहीच सांगायचं नाहीये तुला... फक्त एक संवाद... आणि हे अंतर... खर नाही.. पण तुला समजलंय.. आणि मलाही


No comments:

Post a Comment