बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

“टिम लक लक ते टिम लक”




आज खूप दिवसांनी ‘रंग दे बसंती’ ची आठवण आली. त्यातला DJ आठवला. “ कॉलेज के गेट के ये तरफ हम जिंदगी को नाचते है तो दुजी तरफ जिंदगी हमे नचाती है.”
आजूबाजूला बघताना सारखा हा dialogue आठवतो. काय लिहिलंय! एका dialogue मधे आयुष्य मांडल्यासारखा वाटतं.

खरंय का हे? प्रश्न पडायला लागतो मला. आपलं पण जगणं ह्याच philosophy ने व्हायला लागलंय का? काय बदलतंय आजूबाजूचं? रोजचा तोच तोचपणा आहेच आयुष्यात. पण आतला एक आवाज आता life च्या तालावर नाचायला नाही म्हणतोय.

आताशा त्या टिम लक लक चा त्रास व्हायला लागलाय. तो ताल आता स्वतःविषयीचा चोतेपणा वाढीस लावायला लागलाय. नाही नाचायचं ह्या तालावर. प्रश्न खूप वाढत चाललेत. पण आता प्रश्न पण धूसर होत चाललेत. ह्या प्रश्नांची उत्तरं आता तो तालच द्यायला लागला आहे. ह्या तालाला पर्याय स[अडत नाहीये. कुठे चाललोय मी? हा ताल मला स्वतःमध्येच खेचत चालला आहे. एका मोठ्या empty space मध्ये.

इथे पण खूप लोक आहेत, आज पण खूप फोन येतात, रात्री अपरात्री मेसेज येतात, उशीरा घरी येणं अजूनही थांबलं नाहीये. हे सगळं कोणत्या तरी जुन्या दिवसांसारखा वाटतंय. पण फरक आहेच. रात्रीच्या फोन आणि मेसेज मध्ये काहीच भावना नाहीयेत. उशिरा घरी यायला तिकडे थांबायचं काहीच कारण नाहीये. लवकर घरी पोहोचावस वाटतं आता. ह्या आजूबाजूच्या गर्दीत आपला असा एकही चेहरा सापडत नाहीये.

त्या दिवसांची आठवण येऊन मी सारखा सारखा त्या कट्ट्यांवर जातो. त्या कट्ट्यावरची लोकं पण आता बदललीयेत. ओळखीचा असा एक पण चेहरा दिसत नाहीये इथे. कुठे गेलेत सगळे? काय करतायेत? कुठे होतो आपण? कॉलेजचा परिसर पुन्हा आठवायला लागलाय. ‘टिम लक लक ते टिम लक’ ह्या तालावरच दुसरा पण दिवस सुरु होतो, अगदी पहिल्यासारखा. आज पण कांचे फोन करण्यात आणि घेण्यात busy नेहेमीप्रमाणे.

पण मग एक फोन येतो. समोरून चार शिव्या ऐकायला मिळतात. ताल विरत चाललाय हळू हळू. संध्याकाळी हा अजून चार जणांना गोळा करतो. एकमेकांवर शिव्यांचा पाउस पडतो. ताल वाजायचा पूर्ण थथांबलाय. ती एक संध्याकाळ पुढचे काही दिवस मनात आणि मनात एकाच भावना “ DJ माझा एक मित्र पण तुझ्या theory ला हरवायला पुरेसा आहे.”

२ टिप्पण्या: