शनिवार, ६ डिसेंबर, २०१४

आठवण...





कधी कधी ना काहीच लिहावास वाटत नाही. काहीच बोलावसं वाटत नाही. फक्त तुझ्या आठवणीत रामावासा वाटतं. शांत बसून राहावसं वाटतं. आपोआप आजूबाजूचं भान जातं. शांत बसून राहतो मी. मग माझ्या बाजूला चाललेय डी जे चा पण त्रास होत नाही. कारण तू माझ्याबरोबर असतेस.

मग अशावेळी कोणाचीच गरज वाटत नाही. फक्त तू आणि मी. मी आपल्यातल मस्त बोलणं तयार करतो. त्याच्या background ला कायम एक romantic music चालू असतं.कधी तरी मध्येच पावसाची एखादी सर येते. आपण दोघं कुठेतरी लांब गेलेलो असतो. तिहेच मग नेमका भज्यांच पण stall सापडतो. मग वातावरणातला शिनावता अचानक गायब होतो. प्रसन्ना वाटायला लागतं. खरतर त्यावेळी काय वाटतं ह्याला शब्दच नाहीयेत. ती फक्त एक भावना असते. तो फक्त एकच क्षण...तो फक्त अनुभवत येतो.

थोड्या वेळाने बाहेरचा पाऊस बंद पडतो. आपण दोघं तिथून कुठेतरी निघायला म्हणून उठतो आणि तेवढ्यात आईची हाक ऐकू येते. मला वाटतं कि आईने पाहिलं आपल्याला. पण नाही... तेवढ्यात तू कुठेतरी गायब होतेस आणि आई अचनक म्हणते “काय रे सकाळी सकाळी हि smile!!”  मग मी म्हणतो “आई तू पण ना..काहीही बोलतेस..”

पण मनात मात्र दुसरच काहीतरी चालू असतं. विरहाच पण एक वेगळाच आनंद असतो यार.फक्त आठवणीने कधीतरी मस्त वाटतं.  

सोमवार, ७ जुलै, २०१४

ती



ती त्या दिवशी एकटीच बसली होती bus stop वर. मी तिच्याकडेच पाहत होतो, पण काहीच कळत नव्हतं. एक पुस्तक घेऊन अशा एकाकी stop वर बसण्याचं कारण सापडत नव्हत. बराच वेळ झाला मी इथेच आहे, पण ती नक्कीच पुस्तक वाचत नाहीये, ते फक्त बाहेर दाखवायला आहे. आत एक द्वंद्व चाललंय तिच्या, चेहेऱ्यावरचे भाव वेगळच काहीतरी सांगत होते. आणि प्रश्न मला पडत होते ‘कोण आहे हि? काय करतीये हि इथे? बोलाव का मी हिच्याशी?’ मनातल्या मनात अनेक संवाद तयार झाले होते माझ्या. म्हणजे मी काय सुरुवात करेन आणि मग ती काय reply देईल ह्याचे combinations करून बघत होतो मी. पण खरतर त्यातलं काहीच घडलं नाही. कारण मला सुरुवात कशी करू हेच कळत नव्हत मला. एका अनोळखी मुलीशी बोललो तर ती काय विचार करेल? ह्यापेक्षा आजूबाजूचे काय विचार करतील हि भीतीच जास्त असते मनात.

एवढ्यात जरा बाजूला लक्ष गेलं. एक पोरांचं टोळक त्या मुलीला पाहून comments pass करत होते. पण तिच्यावर ह्याचा काहीच परिणाम होत नव्हता. असं वाटत होता कि हिला काही घेणंदेणच नाहीये आजूबाजुच्यांशी. ती फक्त उत्तर शोधायला आलीये, तिला पडलेल्या प्रश्नांची. आज ती फक्त तिच्यासाठी होती, बाकी तिला काहीच माहिती नव्हतं.पण अशी हि उत्तरं बाहेर मिळतात? त्यासाठी कोणीतरी आपलं माणूस लागतं. त्याला सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं माहिति नसतात, पण ती व्यक्ती असल्यावर असले प्रश्नच पडत नाहीत. आणि मला तर सारखा वाटत होता कि हिला कोणीतरी हवय बोलायला, मनातल सगळं सांगायला. पण ती घाबरतेय आणि मी पण घाबरतोय, पण कोणाला?

अरे एक मिनिट, हा एवढा गोंगाट का वाढलाय? एवढे लोक कुठून आले? आणि ते टोळक कुठे गेलं मागचं? आणि ती कुठे गेली? अग थांब कि, कुठे चाललीयेस? मला बोलायचंय तुझ्याशी. अरे!! हा bus stop पण निघून गेलाय. मी कुठे पुढे पुढे चाललोय? चला आज पुन्हा पुढच्या stop वर उताराव लागणार वाटत. पण अरे!! हि कोण उतरतीये माझ्याबरोबर!!!


बुधवार, २८ मे, २०१४

रास्ता …


रास्ता

यु ही चलते चलते रास्ते पे
कहा आ गये पता नही
हर मोड पर जहां मन्जिल बदल रही थी
ऐसे ही कोई रास्ते पे चल पड़ा था मै


हर राह पर नए साथी मिलते गये
जब मोड़ आया तो साथी भी  बदल गए
कुछ साथी थोड़ी दूर तक चले
पर पता नहीं अभी कहाँ खो गए है


चलते चलते इतना दूर आ गया हु'
समज़ नहीं आ रहा शुरुवात कहाँ की थी
ये शुरुवात के साथियों ने भी
न जाने कौनसे मोड़ ले लिए


अभी सोचता हु रुक जाऊ इस मोड़ पे
एक बार देख लू पीछे मूड  के
पर कोई नज़र नहीं आ रहा
शायद सब चले गए है
अपने अपने रास्ते पे
पर किसीको याद नही


अपने साथी फिर ये मोड़ पे बदल जायेंगे
न जाने वो पुराने साथी किस मोड़ पर मिलेंगे
एक मोड़ ऐसा भी हो
जहां ये सब फिरसे मिले
पर वो मोड़ की चक्कर में
मंजिल से ना भटक जाऊ


ऐसा ही है  रास्ता सा
किस मोड़ पर कौन मिल जाये क्या पता?