Sunday, 5 April 2015

वळणं

वळणं

काहीच सुचेनासं झालंय आताशा. लिहिण्याचं एक spirit मरून गेलय, किंबहुना मारलं जातंय, सगळ्यांकडून आजूबाजूच्या. एक लेखक आतल्या आत घुसमटतो आहे. लिहिण्यासाठी. आणि आता लेखणी पण साथ देईनाशी झालीये.
हा लेखक कोणी मोठा किंवा established माणूस नाहीये. प्रयत्न करतोय तो हळू हळू; शिकण्याचा, observe करण्याचा. पण आता तू शिकण पण विसरून गेलाय. आता त्याला समोरचे आकडे दिसतात फक्त, शब्द पार दुरावले आहेत त्याच्यापासून. आता त्याला फक्त industry ला observe करता येतं, कला केव्हाच लांब निघून गेलीये. आता तो पण जगण्याच्या स्पर्धेत उतरलाय आणि नुसता पळत सुटलाय. कुठे पळत चाललाय त्याला पण माहिती नाहीये.
आधी पण सवय होती त्याला ह्या पळण्याची. पण तेव्हा तो पाळण्यातून सवड काढायचा. रेस विसरून जायचा. बरोबरीचे पार पुढे निघून जायचे आणि तो फक्त हसून त्यांना टाटा करायचा. कारण त्याला त्या rat race मध्ये नुसतच पळायचं नव्हत. थोडीशी उसंत काढून त्या झाडाखाली बसलं कि आपोआप हातात पेन यायचं आणि मग मागोमाग शब्दांना पळावयाचा तो. ह्या शब्दांना शोधायची गरज नव्हती पडली त्याला कधी. ते आपले स्वतःहून मुकाट्याने यायचे. पण आता कोण जाणो काय झालं होतं? शब्द हरवले होते आयुष्यातून त्याच्या. त्या शब्दांना शोधण्यासाठी पण थांबू शकत नव्हता तो.
पूर्वी असा एकटा नव्हता पडला तो. आजूबाजूला सतत चार लोक असायची. खरी नसली तरी त्याच्या हक्काची माणस होती ती. त्यांच्या तोंडून तो वाटेल ते बोलून घ्यायचा. त्याला वाटेल तसा आयुष्य फिरवायचा तो. आणि मग कंटाळा आला कि नवीन लोकांना सोबतीला घ्यायचा तो. आता मात्र त्याची अवस्था त्यांच्यासारखी झाली होती. त्याचा आयुष्य आता दुसरे वाटेल तसं फिरवत होते. त्यांना हवं तेच बोलत होता तो. आणि दुसरीकडे पळणं मात्र चालूच होतं.
आजूबाजूला अनेक लोकं पळत होती त्याच्या. त्याला मधूनच या पळण्याचा कंटाळा यायचा. पण जगाची एक अदृश्य शक्ती त्याला पळवत होती त्या सगळ्यांबरोबर. नाती, जबाबदार्या, बंधनं ढकलत चालले होते त्याला ह्या पळण्यात. त्याला दमायला पण परवानगी नव्हती. थांबायला तर नव्हतीच नव्हती. थांबला तर संपला असता ना तो.
पण पळता पळता त्याला कधीतरी जुन्या वाटा आठवायच्या. आताच्या वाटेतल एखाद वळण त्या वाटेला मिळत असेल ह्या विचाराने कायम वळायचा व्यर्थ प्रयत्न करायचा तो. आपले हरवलेले शब्द त्या वळणांमधल्या झाडात कुठेतरी सापडतील अशी त्याला अपेक्षा होती. पण वळण्यासाठीचे सगळे रस्ते अचानक one way झाले होते.
One way मध्ये घुसणं तर नियमबाह्य आणि हा तर काटेकोरपणे नियम पाळणारा. पण मग त्याला त्याचे जुने साथीदार दिसले. त्याच वळणांवर सारखे दिसत होते त्याला. पळता पळता त्याने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. एकच क्षण.. आणि त्याने मुख्य वाट सोडली आणि त्या माणसांबरोबर पळणं पण सोडून दिलं.
आता तो वळला होता. पुन्हा एकदा नियम तोडून one way मध्ये घुसला होता तो. त्याला त्याचं झाड पुन्हा सापडलं होतं. आता तो इथेच बसणार होता... चिरकाल निद्रेसाठी.

No comments:

Post a Comment